84. मुक्त आत्म्यांचे मार्ग
श्रीकृष्ण
म्हणतात की, “कर्मांच्या फळाची मला स्पृहा नाही.
त्यामुळे कर्मांचे मला बंधन होत नाही. असा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही” (4.14). यातून, आपला
कर्मांवर अधिकार असतो मात्र कर्मफलांवर नाही, हे श्रीकृष्णाचे म्हणणे अधोरेखित
होते
(2.47).
परमात्मा
म्हणून तेही याचेच अनुकरण करतो. श्रीकृष्ण म्हणतात की जरी त्यांनी माणसांमध्ये
विविध भेद निर्माण केले असले तरी तेदेखील कर्ता नाही आणि यातून त्यांना
कर्तेपणाच्या भावनेचा अनुपस्थिती अधोरेखित करावयाचा आहे (4.13).
श्रीकृष्ण पुढे म्हणतात की, "पूर्वीच्या मुमुक्षूंनीसुद्धा (मुक्त आत्मा) असे
जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तुही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेचे
कर" (4.15).
आपल्या
आयुष्यात आपण सामान्यत: कर्मफल मिळविण्यासाठी कर्म करीत असतो. मात्र ज्या वेळेस
आपल्याला कर्मफल सोडावयास सांगितले जाते त्या वेळेस आपण कर्माचाही त्याग करतो.
मात्र, श्रीकृष्ण येथे त्यागाचे वेगळेच प्रतिमान मांडतो आणि आपण कर्मफल आणि
कर्तेपणात गुंतून न पडता कर्म करत राहण्याचा उपदेश करतो. युद्ध लढण्याचा हे त्याचे
अर्जुनाला सांगणे हे या संदर्भात बघायला हवे कारण ते ही एक केवळ कर्मच आहे.
आपल्या
कृतीतून कर्तेपण जाणिवपूर्वक वगळणे हे कठीण काम आहे. मात्र जेव्हा आपण नृत्य,
चित्रकला, वाचन, शिकवणे, बागकाम, स्वयंपाक करणे, खेळ किंवा अगदी शस्त्रक्रिया
यांसारख्या विविध गोष्टींमध्ये पूर्णपणे गुंतून काम करत असतो, आपल्यातील कर्तेपण
गळून पडते. आधुनिक मानसशास्त्रात मनाच्या या स्थितीला ‘flow’ असे म्हणतात. आयुष्यातील असे सुंदर क्षण समजून घ्यावे आणि जगण्याच्या विविध क्षेत्रात ते
मिळवीत राहावे. आपल्या या प्रयत्नांना संपूर्ण विश्वही प्रतिसाद देते हे समजून
घ्यावे.
आयुष्य हा आनंद आहे, चमत्कार आहे. त्याला पूर्णत्व मिळण्यासाठी कर्तापण किंवा कर्मफल यांपैकी कशाचीच गरज नाही. जेव्हा आपण कर्तापण आणि कर्मफल या दोन्हींचा त्याग करून भगवंताशी एकरूप होतो तेव्हा आपल्याला कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळते.

Comments
Post a Comment