91. स्वत:चे अध्ययन

 

‘पोटात आग असणे’ याचा एक अर्थ हा भौतिक जगातील आपल्या इच्छा, आवडी आणि जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी ऊर्जा आणि उत्साह असणे असाही आहे. स्वत:ला समजून घेण्यासाठी जेव्हा ही ऊर्जा वापरली जाते त्याला योगाग्नी म्हणतात. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की, अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयमयोगरुप अग्नी त्यात हवन करतात (4.27).

आपल्या दैनंदिन जीवनात आपण परमात्म्याला आपण सुंदर फुले आणि रुचकर नैवेद्य अर्पण करीत असतो. हा श्लोक आपल्याला त्यापल्याड नेतो आणि सांगतो की यज्ञ (निस्वार्थ कृती) म्हणजे केवळ वस्तूच नव्हे तर चव, सौंदर्य आणि सुगंध यांसारख्या इंद्रियांना जाणवणार्‍या संवेदनांचीही समिधा अर्पण करणे आहे. या संवेदनांमुळे आपण बाह्य जगात गुंतर जातो आणि जेव्हा या संवेदनांचा आपण त्याग करतो तेव्हा आपली विश्वाच्या परमतत्वाशी एकत्व निर्माण होते.

श्रीकृष्ण पुढे म्हणतात की, काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात. काहीजण तपश्चर्यारुप यज्ञ करणारे असतात. तसेच दुसरे काहीजण योगरुप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरुप ज्ञानयज्ञ करणारे असतात(4.28).

श्रीकृष्ण या स्वत:च्या अभ्यासाला किंवा स्वाध्यायाला एकप्रकारचा यज्ञच म्हणतात. या प्रक्रियेतून मानसशास्त्र, वैद्यकशाश्त्र आणि वर्तमानातील स्वयंसाहाय्य साहित्य अशा अनेक गोष्टी निर्माण झाल्या आहेत. लहानपणापासून आपल्यावर राष्ट्रीयत्व, जात किंवा धर्माचे शिक्के लागत जातात आणि पुढील सगळे आयुष्य आपण या शिक्क्यांचे समर्थन करण्यात घालवतो. या शिक्क्यांमुळे अनेक प्रकारची दडपणे किंवा हिंसा यांचा अगदी कमी वयात सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे, हुशार किंवा मंद, मेहनती किंवा आळशी आणि इतर अनेक शिक्के आपल्यावर बसत जातात.

त्याचप्रमाणे, आपण अनेक घटकांच्या आधारे स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल गृहीतके बांधतो आणि त्याच्या बाजूने ऊर्जा खर्च करतो. स्वाध्याय म्हणजे या विभागांचे यज्ञाच्या रूपात परीक्षण करणे आणि त्यांचा त्याग करणे.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही