93. समाधान हेच अमृत

 

श्रीकृष्णाने गीता मध्ये दोन ठिकाणी यज्ञाचा उल्लेख केला आहे (3.9 ते 3.15 आणि 4.23 ते 4.32). काही उद्दिष्टांसह  केलेली कृती आपल्या कर्मबंधनात टाकते असा इशारा तो देतो आणि कोणत्याही कृती आसक्तीशिवाय करण्याचा सल्ला देतो (3.9).  तो हे ही सूचित करतो की यज्ञाच्या निस्वार्थ कृतीत सर्वोच्च शक्ती आहे (3.15) आणि प्रारंभी विश्वाच्या निर्मात्याने हीच शक्ती वापरून सृष्टीची निर्मिती केली (3.10). त्याने यज्ञाची बरीच उदाहरणे दिली (4.23  ते 4.32) आणि शेवटी सांगितले की हे सगळे कृतीतून जन्माला येते आणि त्याची जाणिव असणे आपल्या मुक्तीकडे घेऊन जाते (4.32). हे भगवंताने मुक्तीसाठी दिलेले आश्वासन आहे.

शिवाय, पापाबाबत, श्रीकृष्णाने सूचित केले की, सुख-दुःख, लाभ-हानी, विजय-पराजय या द्वैतांमधील असंतुलनामुळे होणारी क्रिया म्हणजे पाप होय. परिणामी, कर्म बंधने अपराधीपणा, खेद, द्वेष आणि मत्सराच्या रूपात प्रकट होतात. (2.38 आणि 4.21). तो पुढे म्हणतो,ज्याने अंत:करण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनही त्याला पाप लागत नाही (4.21). तो असा निष्कर्ष काढतो की मुमुक्षूंनी आसक्तीचा त्याग करून आपली पापे नष्ट केली आहेत (4.30). हे यज्ञात पापांच्या नाशाबद्दल देवाचे आश्वासन आहे.

श्रीकृष्णाने यापूर्वी म्हटले आहे की आपला कर्मांवर अधिकार आहे पण कर्मफलांवर नाही (2.47).  येथे ते हे ही गुपित सांगतात की यज्ञातील निस्वार्थ कृतींचा परिणाम म्हणून ‘ब्रह्म’ची प्राप्ती होते (सर्वोच्च ईश्वरी तत्त्व- परमात्मा) (4.31). आपण कुणीही असलो तरी आपण जाणिवपूर्वक किंवा अजाणता केलेल्या निस्वार्थ कर्मांची चांगली फळे आपल्याला मिळतात याचे संकेत येथे दिले आहेत. यातून दुसरा निष्कर्ष असा काढता येतो की जर समाधान हा निकष जर आपण मानला तर श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आणि गरीब आणखी गरीब. यज्ञातून प्राप्त होणार्‍या समाधानरुपी अमृताबद्दल भगवंताने दिलेली ही खात्री आहे.

ही प्रेरणा आहे जी कोणतीही कृती पाप बनवते आणि तीच कृती यज्ञासारखी केल्यास पुण्य बनते जे मुक्ती आणि समाधानाचे अमृत आहे.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही