101. कमलपत्राचे अनुकरण
जीवनासकट
कोणतीही भौतिक व्यवस्था ही काही संसाधनांच्या साहाय्याने काही गोष्टींची निर्मिती
करीत असते. आपण शब्द किंवा कृतींतून
होणाऱ्या निर्मितीचे कायम मूल्यमापन करीत असतो. इतरांच्या कृती आणि आजूबाजूची परिस्थिती
यांचेही आपण मूल्यमापन करीत असतो. खरे पाहता उत्क्रांतीच्या प्रक्रियेत धोक्यांचा
अंदाज घेणे हे अस्तित्वासाठी फ़ारच महत्वाचे होते. पण खरा मुद्दा आहे तो कृतींचे
मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांच्या अनुपलब्धतेचा. आपण मूल्यमापन
करण्यासाठी बहुतांश वेळा अज्ञानावर आधारित आकलने आणि आपल्या श्रद्धा यांवर अवलंबून
असतो. त्यांना पूरक अशा कृती आढळल्या तर आपण आनंदी आणि समाधानी होतो.
या
संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात, “ज्याचे मन स्वत:च्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही
आणि शुद्ध अंत:करणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो”
(5.7). त्यामुळे
कोणत्याही परिस्थितीत आपली कृती कलंकित होणार नाही, या संदर्भात देवाचे हे आश्वासन आहे.
श्रीकृष्ण
म्हणतात, जो पवित्र आणि शुद्ध आहे, म्हणजेच द्वेष
आणि वासनांपासून मुक्त आहे आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वत:ला बघतो, अशा
व्यक्तीने केलेले कृत्य कलंकित होत नाही (5.3). यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा
आहे की जेव्हा एखादी व्यक्ती इतरांमध्ये स्वत:ला बघू शकते, तेव्हा ती व्यक्ती
कोणतेही दुष्कृत्य करणारच नाही. याउलट, आपल्या आणि इतरांमधील विभाजनाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व कृती
कलंकित होतात.
आपल्या
भोवतालच्या परिस्थितीचे मूल्यमापन करण्याची वेळ येते तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की
जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून करतो, तो पुरुष
पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून
अलिप्त राहतो (5.10).
आपल्या
आणि इतरांच्या कृती जेव्हा भगवंताला समर्पित केल्या जातात तेव्हा भेदाची कोणतीही
शक्यताच उरत नाही. मग उद्यवणारी
परिस्थितीही केवळ नाटकांसारखीच होते ज्यामध्ये आपण केवळ आपली भूमिका बजावत असतो.
श्रीकृष्ण या स्थितीची तुलना कमलपत्राशी करतो.

Comments
Post a Comment