102. परिणाम समभावाने स्वीकारा

 

श्रीकृष्ण म्हणतात की, कर्मयोगी सङ्ग (आसक्ती) सोडून केवळ इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा अंत:करणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात (5.11). असा अर्थ घेतला आहे की एखाद्याने वर्तमानात जरी कोणत्याही आसक्तीविना कामे केली तरी त्याच्या पूर्वीचा कर्मबंधनांवर लक्ष्य ध्यावे लागते. त्यामुळे, तो कर्मे करीत राहतो. यामध्ये दुसरा ही एक दृष्टिकोण असा आहे की एकदा आसक्ती टाळली की भौतिक किंवा प्रकट जगात प्राप्त करण्यासारखे काही उरत नाही आणि सगळ्या कृती या अंतरात्म्याच्या शुद्धीसाठी घटतात.

श्रीकृष्ण पुढे म्हणतात की, “कर्मयोगी  कर्मांच्या फलांचा त्याग करून भगवत्प्राप्तिरुप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बद्ध होतो” (5.12). गीतेच्या मूलभूत स्तंभांपैकी एक म्हणजे आपल्या कर्मावर आपले अधिकार आहे, परंतु आपल्या कृतींच्या परिणामांवर नाही (2.47). कर्मफळाचा त्यागाचा अर्थ असा आहे की कोणत्याही विशिष्ट परिणामाला प्राधान्य नाही कारण कोणत्याही परिणामाला तो कितीही आश्चर्यकारक किंवा भयंकर असलातरी, समभावाने स्वीकारण्यास कर्मयोगी  तयार असतो. श्रीकृष्णाने आधी सांगितले होते की अयुक्‍त मध्ये बुद्धिमत्ता आणि भावना दोन्हीची कमतरता असते आणि परिणामी, त्याला शांती किंवा आनंद मिळत नाही (2.66).

श्रीकृष्ण पुढे म्हणतात की, “अंत:करण ज्याच्या ताब्यात आहे, असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररुपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने परमात्म्याच्या स्वरुपात स्थिर राहतो(5.13).

कृती करताना किंवा त्याकरिता निमित्त बनत असतानाही मानसिकदृष्ट्य़ा सर्व कृतींचा त्याग करणे ही त्यातली मेख आहे. आपण केले किंवा नाही केले तरी कर्मे होत राहतात आणि आपण केवळ त्यांचा भाग बनतो. आपण जेवल्यानंतर ते अन्न शरीराचा भाग बनेपर्यंत शेकडॊ कृती घडतात आणि आपल्याला त्याबद्दल यत्किंचितही कल्पना नसते. खरे तर मानसिक पातळीवर आपला काहीही सहभाग नसतानाही अन्न पचण्यासारखे चमत्कार घडतात.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही