103. पाप-पुण्याची मुळे
श्रीकृष्ण
म्हणतात की,
"परमेश्वर
मनुष्यांचे कर्तेपण, कर्म किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाहीं;.तर प्रकृतीच खेळ
करीत असते" (5.14).
परमेश्वर हा
कर्ता नाही तर सृजनकर्ता किंवा सृजनशीलता आहे. दोन प्रकारेन निर्मिती होत असतात. पहिली, कुंभार जसे
मातीच्या वस्तू तयार करतो आणि त्याची निर्मिती ही काही काळानंतर त्यांच्यापासून स्वतंत्र होते. दुसरी, ज्याप्रकारे नर्तक किंवा
नर्तकी नृत्याचे सर्जन करते पण ती व्यक्ती नसेल तर नृत्यही राहणार नाही. भगवंत हा
नर्तकासारखा आहे आणि सगळे विश्व त्याच्यावर अवलंबून
आहे मात्र तो त्या विश्वावर अवलंबून नाही. त्यामुळे, नृत्य करणार्या शिवाला नटराज
आणि बासरी वाजविणार्या कृष्णाला मुरारीच्या
रूपात चिन्हित केले जाते.
भगवंत हा रासायनिक
प्रक्रिया घडवून आणणार्या उत्प्रेरकाचीही भूमिके सारखाही पाहिला जाऊ शकतो. उत्प्रेरकाचा उपस्थितीमुळे रासायनिक प्रक्रिया
होते पण त्याचा उत्प्रेरकावर काहीही परिणाम होत नाही.
श्रीकृष्ण म्हणतात
सर्वत्र व्याप्त असे परमेश्वरी तत्त्व कुणाच्याही पाप-पुण्याचा हिशोब ठेवत नाही.
माणसे संभ्रमित होतात कारण त्यांच्या ज्ञानावर मोहाचे आवरण असते (5.15). पण ज्यांचे
अज्ञान हे परमात्मज्ञानामुळे नष्ट झाले असते, त्यांचे ते ज्ञान प्रकाशमान
सूर्याप्रमाणे त्या परमात्म्याला प्रकाशित करते (5.16).
भगवंत
हा चित्रपटगृहातील पडद्यासारखा असतो. काय दाखविले जाते आहे याच्याशी पडद्याला
काहीही देणेघेणे नसते मात्र प्रेक्षकांना विविध भावभावनांचा अनुभव येत असतो.
पडद्यावर दाखवले जाते त्या फक्त सावल्या असतात मात्र आपण त्यात पूर्णपणे गुंतलेलो असतो आणि त्यातून दीर्घकाल परिणाम करणार्या भावना
निर्माण होत असतात. या संपूर्ण प्रक्रियेत पडदा तटस्थ आहे आणि त्याचा आपल्या
भावनांशी काहीही संबंध नाही.
कृष्णाने
या संदर्भात आधी मोह-कलीलम (संभ्रमाचा अंधकार) असा शब्द प्रयोग वापरला आहे (2.52). या मोहातून
एकदा बाहेर पडलो की दैदीप्यमान सूर्याप्रमाणे
जागरूकता समोर येते.

Comments
Post a Comment