104. निष्पक्षता साधणे

 

श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचे मन आणि बुद्धी ‘त्या’ परमतत्त्वाशी एकरूप झाले आहेत आणि परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात (5.17).

जाणिवविहीन जगणे म्हणजे अंधारात जगण्यासारखे आहे, जेथे आपण सारखे धडपडतो आणि स्वतःला ईजा करून वघेतो. पुढचा टप्पा म्हणजे प्रकाशाच्या क्षणिक झोताप्रमाणे आपण जाणिवेचाही क्षणभर अनुभव घेतो आणि पुन्हा अज्ञानात ढकलले जातो. अंतिम स्थिती म्हणजे सूर्यप्रकाशासारखी सत्याची शाश्वत अनुभूती होणे जेथे जाणिव एका महत्वपूर्ण पातळीपर्यंत जाते आणि व्यक्ती तेथून परत येऊ शकत नाही. परत न येण्याच्या या अवस्थेला मोक्ष किंवा परम स्वातंत्र्य असेही म्हणतात. ही माझी मुक्ती नाही, उलट मीपासून स्वातंत्र्य आहे कारण सर्व समस्या मीमुळे आहेत.

ही न परतण्याची पातळी गाठली की समत्व प्राप्त होते. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांनां समदृष्टीनेच पाहतात (5.18). समत्व हे गीतेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे.

सगळ्या जीवमात्रांमध्ये स्वत:च्या अस्तित्वाची जाणिव असणे हा समत्वाचा गाभा आहे (5.7).  आपल्याप्रमाणेच इतरांमध्येही चांगले असू शकते आणि आपल्यातही काही वाईट असू शकते हे समजून घेणे आहे. वरवर दिसणारे भेद आणि विरोधाभास यांना एकाच प्रकारे महत्व देणे ही पुढची पातळी आहे. प्राणी आणि त्याचा भक्षक यांना एकाच पातळीवर बघण्यासारखे हे आहे. अज्ञानातून उत्पन्न होणारे राग-द्वेष यांचा त्याग करण्यासारखे ते आहे (5.3). आपले लाभ आणि तोटे यांना एकच न्याय लावणे आहे. जागृतीतून उत्पन्न होणारी भावना म्हणजे समत्व. असंतुलित मनातून निर्माण होणारे कर्म हे नक्कीच दु:खाला आमंत्रण देणारे असते.

श्रीकृष्ण आश्वासन देतात की ज्यांचे मन समभावात स्थिर झाले, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणून ते परमात्म्यातच स्थिर असतात (5.19).

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही