108. भीतीवर मात करणे
श्रीकृष्ण
म्हणतात, “काम, क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार
करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म
परमात्माच परिपूर्ण असतो” (5.26). इच्छांच्या व्याधी आणि रागाचा मूर्खपणा यांपासून कसे मुक्त व्हावे हा
खरा प्रश्न आहे.
प्रत्येक
चक्रीवादळ शांत होण्याचे एक केंद्र असते. त्याचप्रमाणे आपल्या इच्छा आणि रागाचे
निर्मूलन होण्याचे आपल्यामध्ये एक केंद्र असते आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे
असते. त्यासाठी सर्व इच्छांचा मूलाधार असलेला ‘मी’ त्यागण्याचे धैर्य लागते.
यासाठी
एक तंत्र म्हणजे भूतकाळात केव्हा आपल्याला तीव्र इच्छा किंवा प्रचंड राग आला होता
ती स्थिती पुन्हा अनुभवून बघणे. माझ्यातील 'आत्मा' हा
इतरांमधील 'आत्मा' सारखाच आहे आणि वेगवेगळे लोक एकाच गोष्टीकडे विविध प्रकारे बघतात,’
असे स्वत:बद्दल अधिक जागरूक होऊन त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करावी.
भारतीय
संस्कृतीत आयुष्याला लीला म्हटले आहे म्हणजे हे केवळ एक नाटक आहे त्याला फार
गंभीरपणे घेऊ नये. दुसरे तंत्र असे आहे की ज्याप्रमाणे आपण नाटक करतो तसे
आयुष्याला फार गंभीरपणे न घेता, मस्त आनंदात 7 ते 10 दिवस जगून
बघणे. एखादा कलावंत जसे अभिनयात करतो त्याचप्रमाणे केवळ नाटक म्हणून आपला राग आणि
इच्छा यांचा अनुभव घेणे.
एकदा
हे जमले की मग हळुहळू वर्तमानातही इच्छा आणि राग यांचा त्याग करण्यास आपण शिकायला
लागतो आणि ही अवस्था म्हणजे परम स्वातंत्र्य
म्हणजे वर्तमानात मुक्तीशिवाय दुसरे काही नाही.
अंतिम
पायरी म्हणजे परमात्म्याला शरण जाणे आणि परमात्मा स्वरूपातील श्रीकृष्ण म्हणतात की माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा
भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर,
प्राणिमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी, असे तत्त्वत:
समजून शांतीला प्राप्त होतो (5.29).
याने गीतेचा पाचवा अध्याय पूर्ण होतो ज्याला ‘कर्म संन्यास योग’ किंवा कर्मफलाच्या त्याग करून एकता प्राप्त होते.

Comments
Post a Comment