19. सर्जनशीलता निर्माण करते

 

श्रीकृष्ण म्हणतात की जे सत्य आहे ते वास्तविक असते आणि त्याचे स्थायीत्व कधीही संपत नाही. असत्य हे भ्रामक आणि तात्पुरते असते, त्याचे अस्तित्व नसते. जे अविनाशी आहे आणि जे सर्वव्यापक आहे त्याचे चिंतन करण्यास श्रीकृष्ण सांगतात (2.17).

सामान्यत: असे मानले जाते एखादी गोष्ट ही त्या कर्त्याची निर्मिती आहे. मात्र, श्रीकृष्ण सर्जनशीलतेकडे लक्ष वेधतात, जी सतत विकसित होत जाणारी शक्ती आहे. उदाहरणार्थ, बीजांमधून अंकुरांची निर्मिती. बीज आणि अंकुर (दोन्ही सर्जनशील निर्मिती) नष्ट केले जाऊ शकते, मात्र सर्जनशीलता नाही, जी सतत अविश्रांतपणे कार्यरत असते आणि भवतालाला व्यापून उरलेली असते. निर्मितीचा जन्म होतो आणि मृत्यूनंतर ती अस्तित्वात नसते मात्र सर्जनशीलता नष्ट करता येत नाही.

सर्जनशीलता हीच खरी कर्ता आहे कारण ती निर्मितीला जन्म देते. ती भावनांची निर्मिती करते. ती आपले शरीर आणि मन यांसारख्या गोष्टींची निर्मिती करते.

ज्ञान आणि स्मरणे ही नेहमी भूतकाळाशी संबंधित असतात तर निर्मिती (कर्मफल) हे भविष्य असते. सर्जनशीलता मात्र नेहमीच वर्तमानाशी निगडित असते.

सर्जनशीलता ही इंद्रियांनी घेतलेले चांगले आणि वाईट अनुभव शोषून घेण्यासाठी ज्ञान आणि शहाणपण वापरण्याची क्षमता असते आणि स्वतंत्रपणे अस्तित्वात असते.

आपली इंद्रिये ही केवळ निर्मितीचा अनुभव घेण्यास सक्षम असतात आणि आपण सर्जनशीलतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तवाच्या जाणिवेतून आपण तिच्याशी स्वत:ला जोडून घेऊ शकतो मात्र तिच्यावर मालकी हक्क गाजवू शकत नाही.

आपण जेव्हा सर्जनशीलतेशी स्वत:ला जोडून घेतो तो सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो, मग ते आपले व्यावसायिक आयुष्य असो की वैयक्तिक. एक कर्मयोगी विशिष्ट कौशल्य मिळवून या बाबीचा सहज अंगिकार करू शकतो.

आपला खरा स्वभाव हा सर्जनशीलतेचा असतो मात्र आपण नेहमीच स्वत:चा निर्मितीशी संबंध जोडू बघतो. निर्मितीशी अवास्तवपणे जोडून घेतल्याने आपल्यामध्ये कर्त्याची भावना निर्माण होते आणि तोच अहंकाराचा मूल स्रोत आहे.

ज्या क्षणी आपण स्वत:ला सर्जनशीलतेशी जोडून घेतो, त्या क्षणी आपल्याला सर्वत्र सर्जनशीलता दिसायला लागते. हे साध्य करण्यासाठी आपण स्वत:ला इतरांमध्ये आणि इतरांना आपल्यामध्ये आणि अंतिमत: ‘त्याला’ प्रत्येक गोष्टीत आणि सगळीकडे बघू शकलो पाहिजे असे श्रीकृष्ण सांगतो.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही