77. आरशा सारखे साक्षीदार बना

 

श्रीकृष्ण हे स्पष्ट करतात की, “ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहाते. आणि हे अर्जुना! कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने माणसांचे ज्ञान झाकले आहे(3.38-3.39).

आधी श्रीकृष्ण ने असेही म्हटले आहे की गुणांमध्ये व्यक्तीला संमोहित करण्याची शक्ती असते. रजोगुणातून निर्माण झालेल्या इच्छादेखील असेच करतात. त्यांनी पुढे सविस्तर सांगितले की, “इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्माला मोहित करतो" (3.40).

आरसा हे साक्षीभावाचे उत्तम उदाहरण आहे. परिस्थिती किंवा व्यक्ती यांपैकी जे काही समोर येईल ते जसेच्या तसे दाखवणे हे आरशाचे काम आहे. त्याच्यावर ना भूतकाळाचे दडपण आहे ना भविष्याच्या अपेक्षा आणि तो केवळ वर्तमान दाखवत असतो. या शहाणपणावर धूळ साचते तेव्हा त्याची परिणामकारकता कमी होते.

या रुपकातील आरसा हा आपला खरा स्वभाव आहे आणि त्यावरील धूळ ही आपली जुनी कर्मे आणि इच्छा यांमुळे निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे जाणून घेण्याची आपली क्षमता प्रचंड आहे मात्र आपण मर्यादित ज्ञानात अडकून पडतो. थोडक्यात धूळ म्हणजे आपल्या भूतकाळातील संचित आहे ज्यामध्ये ज्ञान, चांगल्या-वाईट स्मृती आणि आपले आकलन यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, इच्छा या आपल्या शहाणीवेला ग्रासून आपल्या आत्म्याला संभ्रमित करतात.

आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात होणार्‍या महत्वाच्या संवादाकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येईल की आपण भूतकाळाचे खूप मोठे ओझे वाहत असतो आणि वर्तमानाकडे दुर्लक्ष करतो. त्यातून आपली उत्पादकताही कमी होते आणि गैरसमजही निर्माण होत राहतात.

भूतकाळात जगणे हे दु:ख आहे आणि भूतकाळ आपल्याला त्याचे गुलाम बनवू न देणे ही मुख्य गोष्ट आहे. हे करण्यासाठी, आपण भूतकाळाचा एक साधन म्हणून वापर करू शकतो जोपर्यंत आपण स्वतःला चेतनेच्या वर्तमान क्षणाशी कायमचे संरेखित करत नाही.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही