112. आपल्यातील शत्रूपासून सावधान

 



श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्ती स्वतःच्या उद्धारासाठी आणि स्वतःला अधोगतीला आणण्यासाठी जबाबदार आहे (6.5). ही जबाबदारी पार पाडण्यासाठी श्रीकृष्ण मार्गही सांगतात, ज्या जीवात्माने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले, त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही, त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो (6.6). महत्वाचे आहे स्वत:ला जिंकून घेणे. आत्मा हा शब्द श्लोक 6.5 आणि 6.6 मध्ये बारा वेळा येतो आणि त्याच्या विविध प्रकारच्या वापरामुळे विविध अर्थही निघतात. मात्र, साधकासाठी या श्लोकांमध्ये दिलेल्या संदर्भानुसार त्याचा अर्थ हा स्वत:ला जिंकून घेणे असाच आहे.

श्रीकृष्ण म्हणतात, “थंड-उष्ण, सुख-दुःख इत्यादी तसेच मान-अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो; म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच” (6.7). याचा अर्थ सतत विद्यमान असलेल्या द्वंद्वांच्या पल्याड जाणे असाच आहे.

सुख देणार्‍या अनेक लढाया अर्जुनाने जिंकल्या होत्या. मात्र कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, त्याचे शिक्षक, मित्र आणि नातेवाईक हेच त्याच्या विरोधी गटात होते आणि त्यामुळे आपल्या लोकांना गमावण्याचे दु:ख आणि भीती त्याच्या मनात उत्पन्न झाली. कृष्णाने त्याला लगेच सांगितले की इंद्रियजन्य भावनांमुळे उष्णता-थंडी, सुख-दु:ख (शीतोष्णा सुखदुःखदा) असे अनित्य द्वंद्वे उत्पन्न होते असतात आणि त्यांना सहन करणे आपण शिकले पाहिजे (2.14). हे सहन करणे म्हणजेच स्वत:वर नियंत्रण राखणे आहे.

कौतुक आणि टीका यांचा आपल्यावर रोजच परिणाम होत असतो आणि ते थांबविण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळेच त्यांच्यात गुंतण्याऐवजी त्यांना मात करण्याचा आग्रह श्रीकृष्ण वारंवार धरतात.

आपल्याला जे हवे ते मिळणे ही आपली यशाची व्याख्या आहे. मात्र, श्रीकृष्णासाठी यश म्हणजे शांतता मिळविणे आणि स्वत:वर नियंत्रण मिळविणे आहे व त्यातूनच आपण परमात्म्याशी स्वत:ला जोडून घेऊ शकतो. आध्यात्मिक मार्गावरील आपली प्रगती मोजण्यासाठी या फूटपट्टीचा वापर केला जाऊ शकतो.

 


Comments

Popular posts from this blog

89. स्वत: ला मुक्त करा

88. पापाचे पैलू

75. धर्म एक आहे