111. मैत्री स्वत:शी
श्रीकृष्ण
अर्जुनाला म्हणतात, “स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून ध्यावा आणि स्वतःला
अधोगतीला जाऊ देऊ नये,
कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे” (6.5).
मैत्रीप्रमाणेच या अस्तित्वात्मक श्लोकालाही अनेक आयाम आहेत.
सगळ्यात
आधी, यामुळे स्वत:चे उन्नयन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीवर येते. वाईट
म्हणून ओळखली जाणारी कर्मे केली किंवा आपल्याला अपेक्षित कर्मफल मिळाले नाही की
साधारणत: त्याचा दोष आपण इतरांवर म्हणजे कुटुंब, मित्र, सहकारी, परिस्थिती,
कामाच्या ठिकाणची परिस्थिती, देश अशा बाह्य घटकांना देतो. त्यामुळे अनेकांबद्दल
आपल्या मनात खोलवर कटुता निर्माण होते आणि कधी कधी तर ती आयुष्यभर टिकून राहते.
दुसर्या बाजूला, आपल्याला अशा खुपणार्या बाबींचे स्मरण होते त्या त्यावेळी आपण
स्वत:लाच वारंवार शिक्षा करतो. परिणाम काहीही असोत, मात्र हा श्लोक आपल्याला
स्वत:चे उन्नयन करण्यास सांगतो. शरण जाणे, प्रश्न विचारणे आणि सेवा हे तीन गुण
जेव्हा आपण विकसित करतो तेव्हा शिक्षक (गुरू) आपल्याला मदत करण्यासाठी प्रकट होतो
याचे आश्वासन कृष्णाने आपल्याला आधीच दिले आहे (3.34).
दुसरे म्हणजे, ते तुमची परिपूर्णता आणि कमतरता स्वीकारून
तुम्हाला स्वतःबद्दल वाटवाऱ्या अपूर्णतवर मात करून आहे. या परिपूर्णता किंवा अपूर्णता म्हणजे
आपले शारीरिक स्वरूप, आपला त्रासलेला भूतकाळ, आपली शैक्षणिक किंवा आर्थिक स्थिती किंवा आपण ज्या सुखद आणि अप्रिय
परिस्थितींचा सामना केला त्या असू शकतात.
तिसरे,
आपण जेव्हा आपल्याशीच मैत्री करतो, तेव्हा एकटेपणाला जागाच उरत नाही जो नैराश्य, राग
आणि अंमली पदार्थ किंवा स्क्रीनच चे व्यसन लागण्याचे कारण आहे. हे आपल्याला कोणावरही अवलंबून न राहता आनंदी
राहण्यास मदत करते, विशेषत: जेव्हा
एखादी व्यक्ती वृद्धापकाळाच्या जवळ असते.
शेवटी,
स्वत:ची शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक काळजी घेत संतुलित आयुष्य जगले
पाहिजे जेणेकरून आयुष्याच्या प्रत्येक पैलूकदे योग्य लक्ष देता येईल.
एकदा
आपण स्वत:शी मैत्री केली की नैसर्गिकपणे सगळे जग आपले मित्र बनते कारण आपण सगळे
पूर्वग्रह आणि आकलने यांचा त्याग करतो आणि आपण सगळ्या जगाचे मित्र बनतो.

Comments
Post a Comment