24. आत्मा बदलतो जुनी शरीरे

 


श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा मारत नाही आणि मारला जात नाही आणि फक्त अज्ञानी लोक अन्यथा विचार करतात (2.19, 2.20). तो अजन्मा, नित्य (अविनाशी), शाश्वत आणि प्राचीन आहे. श्रीकृष्ण असेही म्हणतात की जसे आपण नवीन कपडे घालण्यासाठी जुने जीर्ण कपडे सोडून देतो, त्याचप्रमाणे आत्मा भौतिक शरीर बदलतो.

वैज्ञानिक संदर्भात हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि intercovertibility of mass and energy  च्या तत्त्वाने उत्तम प्रकारे समजून सांगता येईल. आत्मा हा ऊर्जेसमान आहे असे मानले तर भगवान श्रीकृष्णाचे म्हणणे अगदी स्पष्टपणे कळून येते. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असे म्हणतो की ऊर्जा ही कधीही नष्ट करता येत नाही केवळ ती एका रुपातून दुसर्‍या रुपात रुपांतरित करता येऊ शकते. उदाहरणार्थ, औष्णिक विद्युत प्रकल्प हे औष्णिक ऊर्जेला वीजेमध्ये रुपांतरित करतात. बल्ब वीजेला प्रकाशात रुपांतरित करतो. तर, हे केवळ एक रुपांतरण आहे, नष्ट करणे नाही. बल्बचे आयुष्य कमी असते. तो फ्युज होतो तेव्हा आपण नवीन बल्ब लावतो, मात्र, वीज कायम राहते. जुन्या कपड्यांच्या जागी आपण नवीन कपडे वापरण्यासारखेच हे आहे.

आपल्यासाठी मृत्यू हा अनुमान आहे, अनुभव नाही. आपण असे मानतो की आपण सगळे एक दिवस मरणार आहोत आणि हा निष्कर्ष आपण इतरांना मरताना बघतो त्यावरून काढत असतो. आपल्यासाठी मृत्यू म्हणजे शरीराचे निश्चेष्ट होणे आणि संवेदनांनी काम करणे थांबवणे असे असते. आपला भौतिक मृत्यू समजून घेणे किंवा त्याचा अनुभव घेणे यासाठी आपल्याकडे कोणताही मार्ग नसतो. अपवाद हाच की आपल्या सगळ्यांना मृत्यू येणारच हा निष्कर्ष आपण काढलेला असतो. आपली आयुष्ये मृत्यूभोवती आणि त्यातून उद्भवणाऱ्या भीतीभोवती फिरत असतात.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात इतर सगळे काही शक्य आहे मात्र मृत्यूची काहीही शक्यता नाही, तो केवळ एक भास आहे. जेव्हा कपडे जुने होतात, ते आपले संरक्षण करू शकत नाही आणि त्या जागी आपण नवे कपडे घालतो. त्याचप्रमाणे, आपली शरीरे जेव्हा त्यांचे काम करू शकत नाहीत तेव्हा ती बदलली जातात.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही