26. गुलाब कमळ होऊ शकत नाही


 

श्रीकृष्ण स्वधर्माविषयी बोलतात (2.31-2.37) आणि अर्जुनला सल्ला देतात की क्षत्रिय म्हणून त्याने लढायला संकोच करू नये (2.31) कारण हा त्याचा स्वधर्म आहे.

श्रीकृष्ण गीतेचा प्रारंभ ‘त्या’पासून सुरू करतात जे शाश्वत, अप्रकट आहे आणि सर्वांना व्यापून आहे. समजायला सोपे जावे म्हणून त्याला ‘आत्मा’ असे म्हटले आहे. मग ते स्वधर्माबद्दल बोलतात जे ‘त्या’च्याएक पाऊल आधी आहे आणि मग ते कर्मापर्यंत पोहोचतात.

आपल्या अंतरात्म्याला समजून घेण्याचा प्रवास तीन टप्प्यांमध्ये विभागता येतो. पहिला टप्पा म्हणजे आपली वर्तमान स्थिती, दुसरा टप्पा म्हणजे स्वधर्म समजून घेणे आणि अंतिम टप्पा म्हणजे, अंतरात्म्यापर्यंत पोहोचणे. आपली वर्तमान स्थिती म्हणजे आपला स्वधर्म, अनुभव, ज्ञान, आठवणी आणि आपल्या अचपळ मनाने जमविलेली गृहितके यांचे एकत्रीकरण आहे. जेव्हा आपण आपल्या मानसिक ओझ्यातून मुक्त होतो तेव्हा स्वधर्म हळूहळू स्पष्ट होतो.

क्षत्रिय म्हणजे क्षतआणि त्रययांचे संयोजन. क्षत म्हणजे ईजा आणि त्रया म्हणजे संरक्षण. क्षत्रिय म्हणजे इजेपासून संरक्षण देणारा.

गर्भात असल्यापासून ते स्वावलंबी होईपर्यंत मुलांचे संरक्षण करणारी माता हे क्षत्रियाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आपल्या आयुष्यात येणारी ती पहिली क्षत्रिय असते. बाळाचे संगोपन कसे करायचे हे शिकवलेले नसते आणि त्याचा तिला अनुभवही नसतो मात्र ते तिच्यात निसर्गत: येते. हे स्वधर्माचे गुणवैशिष्ट्य आहे.

एकदा एका गुलाबाला कमळाबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि आपणही कमळ व्हावे अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. मात्र, गुलाब कमळ हॊईल हे अशक्य आहे. जे शक्य नाही ते करण्याची गुलाबाची इच्छा होती. आपल्यातही आपण जे आहोत त्यापेक्षा वेगळे होण्याची प्रवृत्ती असते आणि त्यातून अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही निराशा येते. गुलाब स्वत:चा रंग आणि आकार बदलू शकतो मात्र तरीही तो गुलाबच राहतो जो त्याचा स्वधर्म आहे.

 

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही