31. कर्मयोगात कमी कष्टाने मोठा लाभ

 



 

श्री कृष्ण आश्वासन देतात की कर्मयोगाचे थोडेसे साधन देखील परिणाम देते आणि हा धर्म आपल्याला मोठ्या भीतीपासून वाचवतो (2.40). लक्षात घेण्यासारखे आहे की सांख्ययोग हा शुद्ध जागृती आहे, तर कर्मयोगासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

आपला आध्यात्मिक प्रवास नुकताच सुरू केलेल्या आणि हे प्रयत्न अत्यंत कष्टदायक वाटणार्‍या भक्तांना भगवान श्रीकृष्ण हे आश्वासन देतात. श्रीकृष्णाला आपल्या अडचणी माहिती आहेत आणि तो खात्री देतो की लहानसा प्रयत्नही मोठे परिणाम घडवून आणू शकतो. निष्काम कर्म आणि समत्वाचा मार्ग अवलंबण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहन देतो.

एक मार्ग म्हणजे श्रीकृष्ण ने सांगितलेल्या भक्तीने कर्मयोगाचा अभ्यास सुरू करणे. कालांतराने, जसे आपण कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून आपले अनुभव पाहण्याचा सराव करतो, तेव्हा आपण आपल्या अंतरंगात पोहोचेपर्यंत आपले अनुभव अधिक सखोल होत जातात.

आणखी एक मार्ग म्हणजे आपली भीती समजून घेणे आणि ती घालविण्यासाठी कर्मयोगाचा सराव कसा करायचा हे समजून घेणे. आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जग यांच्यातील फरक म्हणजेच भीतीचा गाभा असतो. कर्मयोग आपल्याला निष्काम कर्माबद्दल शिकवतो ज्यामुळे आपल्या कृतींमधून अपेक्षांना वगळणे आपल्याला शक्य होते. त्याने आपल्यातील भीतीही कमी होते.

रडरला लावलेल्या ट्रीम टॅबवर लहानसा अंतर्गत जोर लावलेला असतानाही पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे चालत्या जहाजाला आपली दिशा बदलण्यात मदत होते. त्याचप्रमाणे आतून योग्य दिशेने केलेला छोटासा प्रयत्न ब्रह्मांडाच्या सद्गुणामुळे मोठा बदल घडवून आणू शकतो, आपल्यासाठी कर्मयोग करण्याचा मार्ग मोकळा करतो.

लहान असताना जोपर्यंत आपण चालायला आणि धावायला शिकलो नाही आपण कधीही प्रयत्न सोडले नाहीत. ते काही सोपे काम नव्हते. त्याचप्रमाणे, कर्मयोगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यास लहान पण निश्चित अशा विजयांची एक मालिकाच आपल्याला अनुभवावयास मिळेल.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही