83. सत्यावर फुलते असत्य
आपल्या
माहिती आहे की जगात सत्य आणि असत्य अशा दोन्ही गोष्टी आहेत. थोडे काळजीपूर्वक
बघितले तर आपल्याला लक्षात येते की असत्य हे सत्याचा चुकीचा अर्थ लावण्यातून
जन्माला येते. असा चुकीचा अर्थ हा एकतर परिस्थितीमुळे लावला जातो किंवा आपली
इंद्रिये आणि मन यांच्या मर्यादांमुळे लावला जातो. साप-दोरीच्या प्रसिद्ध कथेत,
दोरी हे सत्य आहे आणि साप हे असत्य. मात्र दोरीच्या सत्याशिवाय सापाचे असत्य
अस्तित्वात येऊच शकत नाही. मात्र हे आपल्याला समजेपर्यंत, समाजाच्या आयुष्यात तर
कधीकधी कित्येक पिढ्यांपर्यंत, आपल्या सगळ्या कृती आणि विचार हे असत्यावर आधारलेले
राहतात.
त्याचप्रमाणे,
आपण कोणत्याही तंत्रज्ञानाचे उदाहरण घेतले तर त्याचा चुकीचा उपयोग हे असत्य आहे.
ध्वनिक्षेपकाचा उपयोग चांगल्याचा प्रसार करण्यासाठी होऊ शकतो किंवा हिंसा
भडकावण्यासाठीही. त्याचप्रमाणे, आजची समाजमाध्यमे चुकीच्या पद्धतीने वापरली तर
असत्यालाच जन्म देतात.
सत्य आणि असत्याचे हे आकलन श्लोक
4.13 समजून घेण्यासाठी आवश्यक आणि उपयुक्त आहे जेथे श्रीकृष्ण म्हणतात, मी गुण आणि कर्म यांच्या फरकावर आधारित चार वर्ण
निर्माण केले आहेत, परंतु मला
अकर्ता आणि अविनाशी म्हणून जाण.
श्रीकृष्ण
स्पष्टपणे म्हणतात की, असे भेद हे जन्मावर नव्हे तर गुणांवर अवलंबून आहेत आणि ते
कायमस्वरुपी नाहीत आणि त्यांच्यात कोणताही उच्च-नीच भाव नाही. आपल्या सगळ्यांमध्ये
त्रिगुणांचे अस्तित्व वेगवेगळ्या प्रमाणात असते आणि त्यातून कर्मस्वरुपातील चार
विस्तृत भेदांचा जन्म होतो. आपल्या भवतालचे काही लोक हे ज्ञान आणि संशोधन या
प्रवृत्तीचे असतात, काही जण राजकारण आणि प्रशासनातील असतात, काही शेती आणि व्यवसाय
करतात तर काही लोक नोकरी करतात. यातून इंद्रधनुष्याच्या रंगांसारखे वैविध्य जगात
निर्माण होते आणि समाजाला आइनस्टाईन, अलेक्झांडर, पिकासो आणि मदर तेरेसासारखी
माणसे मिळतात.
गुण
आणि कर्मांमुळे माणसे चार प्रकारची असतात हे सत्य आहे आणि हे असत्य आहे की विभाजन
श्रेणीबद्ध आहे आणि जन्मावर आधारित आहे.

Comments
Post a Comment