Posts

Showing posts from September, 2026

120. सगळ्यांमध्ये मी, माझ्यात सगळे

Image
  आपले प्रकट शरीर आणि अप्रकट आत्मा यांच्या एक रू पत्वातून अस्तित्व आकारास येते. आपण प्रकट किंवा अप्रकट यांच्या माध्यमातून अस्तित्वाचा शोध घेत असतो. पहिला भाग आपल्या ओळखीचा आहे. यामध्ये आपण लोक, परिस्थिती आणि गोष्टी यांच्यात भेद करतो कारण आपल्या संवेदनांना केवळ प्रकटाचेच आकलन होते. प्रकटामागील अप्रकट आपल्याला क्वचितच ओळखता येते. त्यासाठी संवेदनांच्या पल्याड जावे लागते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बघतो तेव्हा ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हे आधी बघतो. मग त्या व्यक्तीने कसे कपडे घातले आहेत, त्याचे वागणे कसे, तो किती प्रभावी किंवा श्रीमंत आहे अशा गोष्टींकडे आपले लक्ष जाते. त्यानंतर त्याच्याशी जुळलेल्या आपल्या बर्‍या-वाईट आठवणी पुढे येतात. या सगळ्यांच्या आधारे आपले वर्तन घडत जाते. यासंदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की, “ ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थिती रू प योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व प्राणिमात्रात स्थित व सर्व प्राणिमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो ” ( 6.29 ) . पंचेद्रियांच्या पलीकडे जाण्याच्या हा मार्ग आहे. इंद्रिय...

119. जागरुकता आणि करुणा यांची सांगड

Image
  या पृथ्वीवर वावरलेल्या प्रत्येक महात्म्याच्या शिकवणीत आपल्याला समत्वाची महती गायलेली दिसते. प्रत्येकाचे शब्द, भाषा आणि पद्धत वेगळी असू शकते पण त्यांनी दिलेला संदेश समत्वाचाच आहे. या विरोधातील प्रत्येक उपदेश किंवा पद्धत हा केवळ दुराग्रह आहे. मनाच्या संदर्भात, संवेदना आणि बुद्धी यांच्यातील संतुलन अत्यंत महत्वाचे असते. संवेदनांकडे अधिक झुकलो तर आपण इच्छा आणि वासनांच्या आहारी जाऊ. जर बुद्धीचे प्राबल्य अधिक असले तर आपण अधिक जागृत होऊ पण करुणेच्या अभावी आपण कदाचित इतरांना कमी लेखणे सुरू करू. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दु:ख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे ( 6.32 ) . ही जागृती आणि करुणा यांची एक रू पता आहे. दगड आणि सोने या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्व देण्यास श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. गाय, हत्ती आणि कुत्रा यांच्याही बाबतीत समत्व बघण्यास सांगतात. मित्र आणि शत्रू यांना समान पद्धतीने वागवावे असे तो सांगतो. थोड्या वेगळ्या उदाहरणाने हे समजून घेऊया. लोकांशी वागण्याच्या तीन वि...

118. बदल हेच शाश्वत

Image
  भौतिक किंवा प्रकट जगात बदल ही एकमेव कायम बाब आहे आणि अप्रकट किंवा आत्मा हा अपरिवर्तनीय असतो. त्यामुळे, दोन जगांमध्ये एक रू पता आणण्यासाठी यंत्रणा असणे गरजेचे आहे. रूपक दृष्टया हे फिरणारे चाक आणि स्थिर हब यांच्या यंत्रणेतील बॉल बेअरिंगसारखे किंवा इंजिन आणि चाकांच्या दोन वेगवेगळ्या गती हाताळणार्‍या गिअरबॉक्ससारखे आहे. त्याचप्रमाणे, संवेदना, मन आणि बुद्धी यांची यंत्रणा ही अपरिवर्तनीय आत्मा आणि सतत बदलणारे भौतिक जग यांच्यात कार्यरत असते. श्रीकृष्ण म्हणतात की संवेदना या इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ असतात, मन हे संवेदनांपेक्षा श्रेष्ठ असते आणि बुद्धी ही मनापेक्षा श्रेष्ठ असते. बुद्धीपेक्षाही स्व किंवा आत्मा हा अधिक श्रेष्ठ आहे ( 3.42 ) . संवेदनांचे भौतिक स्व रू प हे जगात होणार्‍या बदलांना आपोआप प्रतिक्रिया देत असते. संवेदनांचे नियंत्रण करणारा भाग आणि स्मरणशक्ती यांच्या संयोगातून मनाची रचना झाली आते आणि संवेदनांनी अनुभवलेले सर्व बाह्य बदल हाताळून आपल्याला सुरक्षित ठेवण्याचे काम मनाने करावे अशी अपेक्षा असते. मात्र, संवेदनांच्या प्रेरणा आपल्या मनाला नियंत्रित करतात की बुद्धी मनाला नियंत्र...