Posts

Showing posts from July, 2026

115. ध्यानाची एक पद्धत

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट मित्र आहात किंवा सर्वात वाईट शत्रू ( 6.6 ). आपला स्वत:चा मित्र बनण्यासाठी , सुख-दु:खाकडे ( 6.7 ) , सोन्या-दगडाकडे ( 6.8 ) आणि शत्रू-मित्रांकडे ( 6.9 ) इंद्रियांचे नियंत्रण करून समत्वाने बघण्याचा मार्ग तो सांगतो ( 6.8 ). यासोबतच श्रीकृष्ण ध्यानाचा मार्गही सुचवतात ( 6.10 - 6.15 ). श्रीकृष्ण सर्व भौतिक बाबींचा त्याग करून एकांतात राहण्यास ( 6.10 ) , खूप उंच नाही किंवा खूप खाली नाही अशा स्वच्छ जागी आसन स्थिर करण्यास ( 6.11 ) ,   पाठ आणि मान ताठ ठेवून , मन एकाग्र करून आणि इकडे-तिकडे न बघता ( 6.12 - 6.13 ) , शांतपणे , न घाबरता , एकाग्र ( 6.14 ) आणि स्वतःशी एकरूप होण्याचा सतत प्रयत्न केल्याने परम शांती प्राप्त होते ( 6.15 ) असे सांगतात . संवेदनांच्या सततच्या जागृतीमुळे समत्व साधणे कठीण होते आणि त्यामुळे एकांतात जाण्याने तात्पुरता आराम मिळतो. यातून अधिक खोलवरचा अर्थ असा आहे की आपण शरीराने जरी एकांतात गेलो तरी ध्यानाच्या दरम्यान आपल्या डोक्यात आपले काम, परिस्थिती आणि लोकांचे विचार सुरूच राहण्याची शक्यता असते. हा श्लोक (6.10) आपल्याल...

114. अति सर्वत्र वर्जयेत

Image
  सोने, दगड आणि मूठभर माती यांच्याबद्दल समत्व बाळगायला श्रीकृष्ण सांगतात ( 6.8 ) . तो पुढे म्हणतो , " सुहृद , मित्र , शत्रू , उदासीन , मध्यस्थ , द्वेष करणाजोगा , बांधव , सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे"   ( 6.9 ) . श्रीकृष्ण वस्तूंपासून प्रारंभ करतात आणि त्यांच्याकडे समत्वबुद्धीने बघण्यास सांगतात. मग तो आपल्या आयुष्यातील लोकांकडे वळतो आणि सगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी समान वर्तन राखण्यास सांगतात. जरा डो ळसपणे बघितले तर लक्षात येईल की लोकांवर आपण विविध शिक्के मारतो आणि त्यानुसार त्यांच्याशी आपले वागणे बदलत जाते. यात रंजक बाब अशी की आपला मित्र हा दुसर्‍याचा शत्रू असू शकतो आणि आज जो आपला मित्र आहे तो कदाचित उद्या आपला शत्रू हो ऊ शकतो. त्यामुळे , सगळे शिक्के हे परिस्थितीवर किंवा आपल्या मतावर अवलंबून असतात. त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला हे सगळे शिक्के वगळून त्यांना समान पातळीवर बघण्यास सांगतात. यामध्ये दडलेला संदेश हा आहे की आपण लोक आणि नाती या उपभोगाच्या वस्तू मानू नयेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की , ज्यांना लोक किंवा नातेसंबंधांचे कटु अनुभव...

113. परिस्थितीचा स्वीकार

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , “ ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे , स्थिती निर्विकार आहे , ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला माती , दगड आणि सोने समान आहे , तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे , असे म्हटले जाते ” (6.8 ).   ज्ञान हे स्वत:बद्दल जाणिव होणे आहे आणि जेव्हा हे साध्य होते तेव्हा व्यक्ती समाधानी होते. वस्तू आणि लोक यांच्याबद्दलचे कुतूहल म्हणजे विज्ञान असे म्हणता येईल. सगळे कुतूहलआणि त्यांची उत्तरे म्हणजेच ज्ञान आहे आणि हे सगळे ज्ञान भूतकाळाबद्दलचे असते आणि पुस्तकांमध्ये उपलब्ध असते. आपल्या आतल्या प्रवासाच्य सुरुवातीच्या काळात कुतूहल अत्यंत उपयुक्त असते मात्र त्याच्या मर्यादा आहेत. कण आणि तरंगांतील द्वैतता आणि अनिश्चिततेची तत्वे यासारख्या मर्यादा अगदी विज्ञानालादेखील स्वीकाराव्या लागतात. दुसर्‍या बाजूला, अस्तित्व हे सतत उत्क्रांत होत असते . कुतुहलामुळे आपण उत्तरे शोधायला जातो, मात्र अस्तित्वामुळे विविध परिस्थिती आणि अनुभवांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि या बाबी आपल्या प्रत्येकाबाबत वेगळ्या असतात. ज्ञानातील समाधान म्हणजे सर्व प्रश्नांची ...