53. इंद्रिय विषयांच्या लालसेचा त्याग


 श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती इंद्रियांद्वारे विषयांची सेवन करत नाही त्याच्यापासून इंद्रिय वस्तू निघून जातात, परंतु रस (लालसा) दूर होत नाही आणि जेव्हा व्यक्ती परमात्म्याची प्राप्ती करते तेव्हाच तृष्णा संपते (2.59). इंद्रियांना एक भौतिक साधन आणि नियंत्रक आहे. मन हे सर्व इंद्रियांच्या नियंत्रकांचे संयोजन आहे. श्रीकृष्ण आपल्याला तृष्णा टिकवून ठेवणाऱ्या नियंत्रकावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात.

श्रीकृष्ण ने ‘रस’ हा शब्द वापरला आहे ज्याचा लाक्षणिक अर्थ फळांचा रस असा आहे. पिकलेले फळ कापल्यानंतर ते पिळेपर्यंत त्याचा रस दिसून येत नाही. दुधातील लोण्याचेही तसेच आहे. रस ही इंद्रियांमध्ये विद्यमान असणारी आंतरिक ओढ आहे.

अज्ञानी अवस्थेत, इंद्रियेही बाह्य वस्तूंशी जुळलेली असतात आणि सुख-दु:खाच्या अवस्थामध्ये सतत हिंदकळत असतात. नंतर नंतर मिष्ठान्नासारख्या बाह्य वस्तू या पैसे नसणे किंवा डॉक्टरांनी दिलेला सल्ला यामुळे दूर सारल्या जातात मात्र मिष्ठान्नांबद्दलची ओढ कायम राहते. बाह्य स्थितींमध्ये नैतिकता, देव/कायदा/प्रतिष्ठा यांची भीती, वय वाढणे, परिस्थिती अशांचा समावेश होऊ शकतो. श्रीकृष्ण त्या अंतिम स्थितीचे वर्णन करतो जेथे ही ओढच संपुष्टात येते.

श्रीकृष्ण ने श्रीमद भागवतात (11:20:21) एक अत्यंत व्यावहारिक सल्ला दिला आहे. जंगली घोड्यांना आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांचा प्रशिक्षक त्यांच्याबरोबर काही काळ धावत असतो. जेव्हा घोड्यांना पूर्णपणे समजून घेणे त्याला जमायला लागते तेव्हा तो त्यांच्यावर आपल्या मर्जीनुसार बसणे आणि रपेट करणे सुरू करतो. श्रीकृष्ण इंद्रियांची तुलना या जंगली घोड्यांशी करतो.

येथे दोन मुद्दे मांडण्यात आले आहेत. पहिला हा की प्रशिक्षक घोड्यांना पहिल्याच प्रयत्नात नियंत्रित करू शकत नाही कारण ते त्याच्यापेक्षा जास्त ताकदवान आहेत. त्याचप्रकारे आपण एकाएकी इंद्रियांना नियंत्रित करू शकत नाही. काही काळ आपल्याला त्यांच्यानुसार वागावे लागेल, जोपर्यंत आपण त्यांना समजून घेऊ शकत नाही आणि मग हळुहळू आपण त्यांना नियंत्रित करू शकतो. दुसरे म्हणजे, आपण इंद्रियांच्या प्रभावाखाली असताना देखील आपल्याला जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

जागरूकता आणि लालसा एकत्र असू शकत नाहीत. जागरूकता मध्ये आपण लालसांना बळी पडू शकत नाही कारण हे केवळ अज्ञानात घडते.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही