64. सर्वोत्तम काम करा

 

श्रीकृष्ण म्हणता, “तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत” (3.8).

मानवी शरीर टिकून राहावे याकरिता अन्नसंग्रह करणे आणि ते ग्रहण करणे आवश्यकच आहे. त्याशिवाय, मानवी शरीरात अनेक अवयव, व्यवस्था आणि रसायने असतात जी नियमितपण अनेक अंतर्गत कामे करीत असतात. त्यापैकी, एखादी कृती जरी चुकली तरी शरीरातील सुसंगततेवर परिणाम होतो आणि शरीराला त्रास होतो किंवा ते नष्टही होऊ शकते. त्या दृष्टीने शरीराची देखभाल निष्क्रियतेतून शक्य होणार नाही.

श्रीकृष्ण विहित कृती करण्याबद्दल बोलतात, जी एक जटिल संकल्पना आहे. पवित्र धर्मग्रंथांमध्ये दिलेले विधी आणि समाजाने आपल्यावर लादलेली कर्तव्ये ही सामान्यतः विहित कार्य म्हणून घेतली जातात. परंतु ते दोघेही श्रीकृष्णाच्या संदेशाची व्याख्या करण्यात अयशस्वी ठरतात.

भौतिक जगात आपली सर्वोच्च क्षमता प्राप्त करणे हे आपले बंधनकारक काम आहे. एखादे बीज जसे मोठ्या वृक्षात परिवर्तित होते किंवा आपल्या जीन्समध्ये असलेल्या सूचनांबरहुकुम वागत एका पेशीतून जसे गुंतागुंतीचे मानवी शरीर निर्माण होते तसे. यातून हे स्पष्ट होते आपल्या जीन्समधून पेशींकरता येणार्‍या सूचनांप्रमाणेच  आपल्या गुणांनी आपल्यासाठी कर्माची निवड केली आहे. त्यामुळे, उरते ते केवळ सूचना स्वीकारणे किंवा ‘कृती करणे’, ज्यामध्ये वाढणे, बरे होणे आणि संरक्षण करणे यांचा समावेश असतो.

आपला संपूर्ण क्षमतेने आपण सर्वोत्तम काम केले पाहिजे. आपण काय करतो आहे इथपर्यंतच ते मर्यादित नाही तर किती चांगले काम आपण करतो आहे हेदेखील महत्वाचे आहे. अर्थात, आपली क्षमता, अनुभव आणि वेळ यानुसार सर्वोत्तम म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या बदलू शकते. केवळ उपस्थित असणे, शांत राहणे किंवा आस्थेने ऐकणे हे देखील सर्वोत्तम काम असू शकते. हे आपल्याला मोक्षाच्या त्या शाश्वत अवस्थेकडे (गुणांच्या पलीकडे) घेऊन जाईल (2.72). हे करण्याबद्दल आहे, निवडण्याबद्दल नाही कारण आपला जन्म जो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना आहे तो आपल्या आवडीने झालेला नाही.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही