70. काळालाही द्या एक संधी
फळ
वाढण्यासाठी आणि पिकण्यासाठी त्याच्या मूळ झाडातील पोषक तत्वे शोषून घेतात.
त्यानंतर तो आपला प्रवास सुरू करण्यासाठी झाडापासून वेगळा होतो. मूळ वृक्षापासून
मुक्तीच्या प्रवासाच्या सुरुवातीपासून ते शेवटी वृक्ष होण्यापर्यंत विविध
उपक्रमांचा समावेश आहे. दुसरीकडे, एक अपरिपक्व फळ परिपक्व होईपर्यंत मूळ झाडाशी संलग्न असणे आवश्यक आहे, म्हणजेच स्वतःचा
प्रवास सुरू करण्यास सक्षम आहे.
पिकलेल्या
फळाने न पिकलेल्या फळाला झाडापासून वेगळे होण्याचे प्रलोभन दाखवू नये कारण
स्वतंत्र प्रवास सुरू करण्याइतपत ते अद्याप सक्षम झालेले नाही. मूळ झाडापासून
योग्य पोषण घेण्यासाठी त्याने पुरेसा वेळ दिला नाही तर ते नष्ट होईल. त्याच
धर्तीवर, “परमात्मस्वरुपात स्थिर असलेल्या ज्ञानी माणसाने शास्त्रविहित कर्मांत
आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा
निर्माण करू नये. उलट स्वत: शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत
त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावी,” असा सल्ला श्रीकृष्ण देतात (3.26).
पूर्वी
श्रीकृष्ण म्हणाले होते की, जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रियांना जिद्दीने दाबून त्या इंद्रियांच्या
वस्तूंचा आपल्या मनात विचार करत राहतो, त्याला लबाड म्हणजेच अहंकारी म्हणतात (3.6). असे लोक स्वतःला भ्रमित
करतात आणि त्यांची परिस्थिती त्या अज्ञानी लोकांपेक्षा वेगळी नसते ज्यांची कृती
बुद्धिमान व्यक्तीने जबरदस्तीने थांबवली होती. याचे वर्णन वरील श्लोक 3.26 मध्ये केले आहे.
शंभर
विद्यार्थ्यांच्या वर्गात एकच धडा प्रत्येक विद्यार्थी आपापला स्वभाव आणि मनस्थिती
यानुसार शिकत असतो. त्यामुळेच ज्या संन्याशाला आयुष्यात विशिष्ट हेतूने केलेल्या कृतींमधील निरर्थकता लक्षात आली असते त्याने
ब्रह्मचारीनला कौटुंबिक आयुष्यापासून परावृत्त करू नये कारण ब्रह्मचारी ही
निरर्थकता त्याच्या स्वत:च्या कृतींमधून शिकू सकतो. त्यासाठी इतर दुसरा कोणताही मार्ग नाही.
श्रीमदभगवद्गीता
सांगण्याआधी कृष्णाने अर्जुनात ‘शिकण्याची भूक’ निर्माण होण्याची वाट बघितली.
तोपर्यंत, कृष्णाने त्याला भौतिक कृती करू दिल्या, भौतिक सुखांचा आणि दु:खांचा
अनुभव घेऊ दिला आणि योग्य वेळ येण्याची वाट बघू दिली. शिकण्याची जेव्हा आंतरिक
इच्छा निर्माण होते तेव्हाच खरे शिकणे घडते. त्या स्थितीत प्रत्येक गोष्ट आणि आयुष्यातील प्रत्येक स्थितीच शिक्षक बनून पुढे येते.

Comments
Post a Comment