114. अति सर्वत्र वर्जयेत
सोने,
दगड आणि मूठभर माती यांच्याबद्दल समत्व बाळगायला श्रीकृष्ण सांगतात (6.8). तो पुढे म्हणतो, "सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणाजोगा, बांधव, सज्जन आणि पापी
या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे" (6.9).
श्रीकृष्ण
वस्तूंपासून प्रारंभ करतात आणि त्यांच्याकडे समत्वबुद्धीने बघण्यास सांगतात. मग तो
आपल्या आयुष्यातील लोकांकडे वळतो आणि सगळ्या प्रकारच्या व्यक्तींशी समान वर्तन
राखण्यास सांगतात. जरा डोळसपणे बघितले तर
लक्षात येईल की लोकांवर आपण विविध शिक्के मारतो आणि त्यानुसार त्यांच्याशी आपले
वागणे बदलत जाते. यात रंजक बाब अशी की आपला मित्र हा दुसर्याचा शत्रू असू शकतो
आणि आज जो आपला मित्र आहे तो कदाचित उद्या आपला
शत्रू होऊ शकतो. त्यामुळे, सगळे शिक्के हे
परिस्थितीवर किंवा आपल्या मतावर अवलंबून असतात. त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला हे
सगळे शिक्के वगळून त्यांना समान पातळीवर बघण्यास सांगतात.
यामध्ये
दडलेला संदेश हा आहे की आपण लोक आणि नाती या उपभोगाच्या
वस्तू मानू नयेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्यांना लोक किंवा नातेसंबंधांचे कटु
अनुभव आले आहेत ते म्हणतात की त्यांना उचित आदर दिला गेला
नाही. ते उपभोगाच्या वस्तू म्हणून वापरले गेले.
अंतिमत:
श्रीकृष्ण म्हणतात, “जो खूप खातो किंवा अजिबातच खात नाही, जो खूप झोपतो किंवा
अजिबातच झोपत नाही अशांसाठी हा योग नाही” (6.16). विविध इंद्रियांचे वर्तन सांगण्यासाठी
येथे खाण्याचे रुपक मांडण्यात आले आहे. लट्ठपणा आणि अनियंत्रित खाणे याबाबत आपल्या
लक्षात येते की आपण आपले मन आणि जीभ यांचे समाधान करण्यासाठी खात राहतो. असे
करताना आपण आपल्या शरीराला किती गरज आहे याचा विचार करीत नाही आणि त्यामुळे आपले
आरोग्य खराब होते. आपले बोलणे आणि इंद्रियांचा अनियंत्रित वापर यातूनही आपल्या वाटयाला दु:खच येते. म्हणूनच श्रीकृष्ण इंद्रियांचे
संतुलन साधण्याबद्दल सांगतात.

Comments
Post a Comment