113. परिस्थितीचा स्वीकार
श्रीकृष्ण
म्हणतात, “ज्याचे अंतःकरण
ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला माती, दगड आणि सोने
समान आहे, तो योगी युक्त
म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते” (6.8).
ज्ञान
हे स्वत:बद्दल जाणिव होणे आहे आणि जेव्हा हे साध्य होते तेव्हा व्यक्ती समाधानी
होते. वस्तू आणि लोक यांच्याबद्दलचे कुतूहल म्हणजे विज्ञान असे म्हणता येईल. सगळे
कुतूहलआणि त्यांची उत्तरे म्हणजेच ज्ञान आहे आणि हे सगळे ज्ञान भूतकाळाबद्दलचे
असते आणि पुस्तकांमध्ये उपलब्ध असते. आपल्या आतल्या प्रवासाच्य सुरुवातीच्या काळात
कुतूहल अत्यंत उपयुक्त असते मात्र त्याच्या मर्यादा आहेत. कण आणि तरंगांतील द्वैतता आणि अनिश्चिततेची तत्वे यासारख्या मर्यादा
अगदी विज्ञानालादेखील स्वीकाराव्या लागतात.
दुसर्या
बाजूला, अस्तित्व हे सतत उत्क्रांत होत असते. कुतुहलामुळे
आपण उत्तरे शोधायला जातो, मात्र अस्तित्वामुळे विविध परिस्थिती आणि अनुभवांना
आपल्याला सामोरे जावे लागते आणि या बाबी आपल्या प्रत्येकाबाबत वेगळ्या असतात.
ज्ञानातील समाधान म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे नसते तर व्यक्तीचे कुतूहलच
नष्ट होणे आहे आणि ही स्थिती म्ह्णजे
साक्षी किंवा दृष्टा अवस्था गाठण्यासारखे आहे. खरे म्हणजे हे वस्तू, लोक आणि
परिस्थितीचा जसे आहेत तसा, कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता, कोणत्याही अपेक्षेविना
स्वीकार करणे आहे आणि ही निवडरहित जागरूकताची अवस्था आहे.
विचलित
न होणे आणि इंद्रियांवर विजय प्राप्त करणे याबद्दल श्रीकृष्ण मार्गदर्शन करतो.
कुणी आपली स्तुती करतो तेव्हा आपल्याला वाटते त्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आपण
पात्र आहोत. मात्र टीका झाली तर ती स्वीकार न करताआपल्याला राग येतो. स्तुती हे
गोड विष किंवा सापळा आहे हे समजून घेतले की आपण कौतुक आणि टीका यांच्या
द्वंद्वांच्यापल्याड जाण्याचा आपला प्रवास सहज सुरू करू शकतो. कौतुक, टीका, सोने,
माती किंवा दगड यांच्यात जेव्हा आपण समत्व बघू लागतो तेव्हा आपण विचलित होत नाही.

Comments
Post a Comment