115. ध्यानाची एक पद्धत

 

श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट मित्र आहात किंवा सर्वात वाईट शत्रू (6.6). आपला स्वत:चा मित्र बनण्यासाठी, सुख-दु:खाकडे (6.7), सोन्या-दगडाकडे (6.8) आणि शत्रू-मित्रांकडे (6.9) इंद्रियांचे नियंत्रण करून समत्वाने बघण्याचा मार्ग तो सांगतो (6.8). यासोबतच श्रीकृष्ण ध्यानाचा मार्गही सुचवतात (6.10-6.15).

श्रीकृष्ण सर्व भौतिक बाबींचा त्याग करून एकांतात राहण्यास (6.10), खूप उंच नाही किंवा खूप खाली नाही अशा स्वच्छ जागी आसन स्थिर करण्यास (6.11),  पाठ आणि मान ताठ ठेवून, मन एकाग्र करून आणि इकडे-तिकडे न बघता (6.12-6.13), शांतपणे, न घाबरता, एकाग्र (6.14) आणि स्वतःशी एकरूप होण्याचा सतत प्रयत्न केल्याने परम शांती प्राप्त होते (6.15) असे सांगतात.

संवेदनांच्या सततच्या जागृतीमुळे समत्व साधणे कठीण होते आणि त्यामुळे एकांतात जाण्याने तात्पुरता आराम मिळतो. यातून अधिक खोलवरचा अर्थ असा आहे की आपण शरीराने जरी एकांतात गेलो तरी ध्यानाच्या दरम्यान आपल्या डोक्यात आपले काम, परिस्थिती आणि लोकांचे विचार सुरूच राहण्याची शक्यता असते. हा श्लोक (6.10) आपल्याला सांगतो की आपण या सगळ्या गोष्टींना एकांतात जाताना मागे ठेवले पाहिजे राहिले पाहिजे. शेवटी, हे अगदी युद्धातही अर्जुनाने मानसिक एकांत अनुभवण्यासारखेच आहे.

भौतिक गोष्टींचा त्याग करणे म्हणजे ध्यानाला जाण्याअगोदर आपल्या सगळ्या भौतिक गोष्टींचे दान करून टाकणे नव्हे. त्या गोष्टींचा आवश्यक तेव्हाच वापर करणे आणि त्यामधील आसक्ती काढून टाकणे असा त्याचा अर्थ आहे. त्यांना 'मी'चा भाग होऊ देऊ नये.

अंतिमत: श्रीकृष्ण भीतीचा त्याग करण्याचा उपदेश करतात. वस्तू किंवा लोक आपल्यापासून दूर जातील ही आपली मूलभूत भीती असते आणि वस्तुत: ते आपल्यालाच काही प्रमाणात गमावणे असते. दुसर्‍या बाजूला, अध्यात्मात, आपल्याला विचारांचा त्याग करावा लागतो, वस्तूंवरील मालकी हक्क सोडावा लागतो आणि लोकांपासून दूर राहावे लागते. त्यामुळे, शाश्वत ध्यानाची स्थिती म्हणजेच मोक्षप्राप्तीच्या मार्गावरील या भीतीचा इशाराच श्रीकृष्ण आपल्याला देतात.


Comments

Popular posts from this blog

88. पापाचे पैलू

90. त्यागाचा त्याग

67. संबद्ध आणि असंबद्ध