117. कला संयमाची
अनेक कारणांसाठी मेंदू हा एक
अनोखा अवयव आहे. त्याच्यातील एक महत्वाचा कारण म्हणजे तो वेदना अनुभवू शकत नाही कारण त्याच्यात वेदना वाहून नेणार्या नोसिसेप्टर्स या उतीच नाहीत.
त्याच्या या वैशिष्ट्यामुळे शल्यचिकित्सक रुग्ण जागा असतानाही मेंदूची शस्त्रक्रिया करू शकतात.
भौतिक
सुख-दुःखे ही मेंदूच्या निष्पक्ष स्थितीशी
केलेल्या तुलनेचे परिणाम आहेत. आपल्या
सगळ्यांमध्ये असा निष्पक्ष बिंदू असतो आणि तुलना केल्यामुळे दु:ख आणि सुख अशा द्वंद्वांची निर्मिती होते. ही पार्श्वभूमी आपल्याला श्रीकृष्ण काय म्हणतात
हे समजून घेण्यास मदत करेल की, जेव्हा
योगाच्या अभ्यासाने संयमी मन स्थिर होते आणि ज्यामध्ये ते स्वतःला पाहते तेव्हा ते
आत्मसंतुष्ट होते (6.20).
एका
जागी शांत होणे हे महत्वाचे आहे. सतत भरकटणारे आणि हिंदकळणारे मन एका जागी स्थिर
करणे गरजेचे आहे. यासाठी श्रीकृष्ण संयमाचा मार्ग सांगतो. हा संयम म्हणजे भावनांचे
दमन करणे किंवा त्या व्यक्त करणे नव्हे. जागृत अवस्थेत केवळ त्यांचे निरीक्षण
करायला हवे. आपण भूतकाळात अनुभवलेल्या घटनांचे विश्लेषण करून हा संयम साधणे शक्य
आहे. शेवटी, हे सर्वत्र स्वतःला स्वतःच्या रूपात पाहण्याबद्दल आहे.
एकदा
आपण ही संयमाची कला आत्मसात केली की आपण सुख आणि दु:खाची द्वंद्वे पार करून
निष्पक्ष बिंदूला किंवा सर्वोच्च सुखापर्यंत पोहोचतो.या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात,
“इंद्रियातीत, केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत
आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी
परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच
विचलित होत नाही” (6.21).
हे
सर्वोच्च सुख हे इंद्रियांतीत आहे. या स्थितीत, व्यक्तीला इतरांकडून सुख मिळावे
किंवा रुचकर अन्न मिळावे अशा अपेक्षा उरत नाहीत. निष्काम कर्म मध्ये किंवा
ध्यानाच्या स्थितीत आपण सगळे जण असा आनंद मिळवितो. तो आनंद जाणवून घेणे आणि त्यावर
विचार करणे महत्वाचे आहे.

Comments
Post a Comment